मुंबईतील ‘हा’ विभाग कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट, एका दिवसात तब्बल 166 रुग्णांची नोंद


मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने लक्षणीय वाढ होत आहे. दरम्यान धारावी, दादर आणि माहिमला मागे टाकत मोठ्या प्रमाणात अंधेरी पूर्व, जोगेश्वरी विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यामुळे मुंबईतील के पूर्व वॉर्ड हा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरत आहे. मुंबईतील सर्वाधिक 3 हजार 782 रुग्ण अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरीचा समावेश असलेल्या के पूर्व वॉर्डात आढळून आले आहेत. दादर, धारावी आणि माहिमचा कालपर्यंत समावेश असलेला जी उत्तर विभागात सर्वाधिक रुग्ण होते. पण, अंधेरी आणि जोगेश्वरीमध्ये काल एका दिवसात 166 नवे रुग्ण आढळले आहेत.

आतापर्यंत मुंबईतील धारावी-दादर-माहिमचा समावेश असलेला मोठा हॉटस्पॉट जी उत्तर विभागात सर्वाधिक रुग्ण असल्याने प्रथम क्रमांकावर होता. पण, अंधेरी आणि जोगेश्वरीमध्ये काल एका दिवसात 166 नवे रुग्ण आढळल्याने अंधेरी पूर्व आणि जोगेश्ववरीचा समावेश असणारा के पूर्व विभाग आता प्रथम क्रमांकावर आला आहे.

दरम्यान 1 लाख 4 हजार 568 वर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे. दिलासादायक बाबमध्ये काल एकूण 1550 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहेत, तर कालपर्यंत कोरोनावर एकूण 49 हजार 346 रुग्णांनी मात केली आहे. काल राज्यात एकूण 113 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर सध्या 51 हजार 379 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Leave a Comment