दिशा पटनीच्या आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा


आज अभिनेत्री दिशा पटनीचा 28 वा वाढदिवस आहे, त्याचबरोबर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचाही आजच वाढदिवस आहे. दिशा आणि आदित्य यांच्या नावाची मागच्या वर्षभरात सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. दरम्यान दिशाने आज आदित्य यांच्या वाढदिवसाशी ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्याने आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा या दोघांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

आदित्य ठाकरे यांना दिशा पटनीने ट्विटच्या करुन शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्विटमध्ये तिने, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आदित्य ठाकरे. असाच चमकत राहा…’ दिशाने यासोबत स्माइली आणि हार्टवाला इमोजी सुद्धा ट्विट केला आहे. सोशल मीडियावर दिशाच्या या ट्विटनंतर आदित्य आणि दिशाच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.


दिशा पटनी आणि आदित्य ठाकरे यांना मागील वर्षी एका डिनर डेटनंतर एकत्र स्पॉट केले गेले होते आणि या दोघांच्या नावाच्या त्यानंतर चर्चा रंगल्या. त्यानंतर दिशाने एका मुलाखतीत आदित्य ठाकरे यांच्या कामाचे कौतुक केले होते आणि त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीस शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

त्याचबरोबर राज्यातील सहा तरुण आमदारांनी काही महिन्यांपूर्वी संगमनेरच्या अमृतवाहिनी महाविद्यालयात ‘संवाद तरुणाईशी’ या कार्यक्रमात संवाद साधला होता. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी या आमदारांची मुलाखत गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी घेतली होती. यावेळी दिशाचे नाव न घेता अवधूत गुप्तेंनी आदित्य ठाकरेंची फिरकी घेतली होती. पण त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी तुमची दिशा चुकत असल्याचे म्हणत त्यांना धम्माल उत्तरही दिले होते.

Leave a Comment