चीनला या क्षेत्रातही धोबीपछाड देणार भारत

फोटो साभार इंडिअन फोक

करोनाचा जगभर प्रसार करण्याचे पाप केलेल्या चीनची विश्वासार्हता जगभर धोक्यात आली असल्याने मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा भारत घेत आहे. जगभरातील अनेक देशांकडून फ्रोजन फूडला असलेली मागणी पाहता भारताने या बाबतीतही योग्य पावले उचलून ही निर्यात वाढविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. फ्रोजन फूड चीन मधून मोठ्या प्रमाणावर जगभरात निर्यात होते मात्र आता चीनवर या बाबतही विश्वास ठेवण्यास अनेक देश कचरत असल्याचे ब्लूमबर्गच्या अहवालात नमूद केले गेले आहे.

ब्लूमबर्गने केंद्रीय खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार भारताला ही मोठी संधी असून द.आशियाई देश चीनला पर्याय शोधू लागले आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने या क्षेत्रातील कंपन्यांना पूर्ण सहकार्य देऊ केले आहे. खाद्य उत्पादनात भारत जगात दोन नंबरचा देश असला तरी आपल्याकडे कोल्ड स्टोरेज तसेच अन्य पायाभूत सुविधा चीनच्या तुलनेने कमी आहेत. त्यामुळे स्थानिक कंपन्यांना फूड प्रोसेसिंग साठी सरकार सर्वतोपरी मदत करत आहे.

फूड प्रोसिसिंग मोठ्या प्रमाणावर सुरु झाले की सरकारने शेतकऱ्यांना २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पट करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यास मदत होणार आहे. त्यासाठी निर्यात वाढ व्हावी असा प्रयत्न केला जात आहे. भारताच्या कृषी निर्यात, प्रोसेस फूड उद्योगात २५ टक्के वाढ झाली असून दरवर्षी त्यात ८ टक्के वाढ होते आहे असे समजते. करोना संकटाचा फायदा घेऊन २०२२ पर्यंत ही निर्यात सध्याच्या १२ अब्ज डॉलर्स वरून ६० अब्ज डॉलर्सवर नेली जाईल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment