कोरोनाच्या भीतीपोटी चक्क साबणाने धुतली कोथिंबीर… ; व्हिडिओ व्हायरल


देशभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी देशातील प्रत्येक नागरिक आपआपल्या परीने काळजी घेत आहे. त्यातच आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे लोकांच्या मनात आता कोरोनाबाबत चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे लोक बाहेरील कोणतीही वस्तू घरात आणण्यापूर्वी व्यवस्थित स्वच्छ किंवा सॅनिटाइझ करत आहेत. अशातच सध्या एक व्हिडिओ टीक-टॉकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

@1993pikachu

1st rank par agyi humari ye vedio 7 din huye upload kiya or 40million views and 1.6M likes..thank uh is vedio koi itna pyar dene ke ##jabalpuriyamuser

♬ original sound – 1993pikachu


कोरोनाच्या भीतीमुळे एक मुलगी कोथिंबीर चक्क साबणाने धुवून घेत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ पाहून नेटकरी कोथिंबीर साबणाने स्वच्छ करणाऱ्या मुलीवर खूप हसत आहेत. तर काही नेटकरी तिच्यावर टीकाही करत आहेत. कोरोनामुळे खबरदारी म्हणून एकीकडे लोक भाज्या गरम पाण्याने धुवून घेत असताना या मुलीने मात्र कोथिंबीर साबणाने धुतली आणि व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये ती मुलगी कोथिंबीरवर पाणी टाकल्यानंतर साबणाने कोथिंबीर धुताना दिसत आहे.

हा व्हिडिओ टीक-टॉकवर काही दिवसांपूर्वीच अपलोड करण्यात आला असून तो चार कोटींहून अधिक जणांनी बघितला आहे. या व्हिडिओवर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने तर तुम्ही कोथिंबिर वॉशिंग मशीनमध्ये धुतली तर अजून स्वच्छ होईल, असे म्हटलं आहे. तर अन्य एका युजरने, हे अत्यंत चुकीचे असून तुमचे आरोग्य यामुळे बिघडू शकते, असे म्हटले आहे.

Leave a Comment