वाढदिवसानिमित्त काका-पुतण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्यावरील कोरोना संकटामुळे आपला वाढदिवस साधेपणाने कुटुंबियांसोबतच साजरा करणार आहेत. तर त्यांचे पुतणे आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात राज ठाकरे यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा असल्याचे आवाहन केले आहे. तर आदित्य ठाकरे यांनी तुम्ही जिथे असाल तिथूनच आशिर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन केले आहे.

उद्या म्हणजे 13 जून रोजी आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे. तर 14 जून रोजी राज ठाकरे यांचा 52 वा वाढदिवस आहे. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्याच पार्श्वभूमीवर आपापल्या सोशल अकाऊंटवरुन पत्रक जाहीर करुन कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

Leave a Comment