पालघर साधू हत्या प्रकरण : सीबीआयकडून चौकशीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडे मागितले उत्तर

पालघर येथे जमावाकडून दोन साधूंची हत्या करण्यात आलेल्या प्रकरणाचा तपास सीबीआय अथवा एनआयएने करावा या संदर्भात सर्वोच्च न्यायायलयात याचिका दाखल करण्यात आली होती. आता या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले आहे.

न्यायमुर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून दोन याचिकांवर सुनावणी केल्यानंतर महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे.

पहिली याचिका पंच दशबन जूना आखाडाचे साधू आणि मृत साधूंच्या नातेवाईकांनी दाखल केली होती. याचिकेमध्ये आरोप केला आहे की पालघर येथे 18 एप्रिलला झालेल्या या घटनेचा तपास राज्य पोलीस योग्यरित्या करत नाहीत. तर दुसरी याचिका एएनआयद्वारे या घटनेची चौकशी व्हावी यासाठी घनश्याम उपाध्याय यांनी दाखल केली होती.

Leave a Comment