समूह संसर्गासंदर्भात आरोग्य मंत्रालयाची महत्त्वपूर्ण माहिती


नवी दिल्ली – देशात आणि खासकरुन मुंबई आणि दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे समूह संसर्ग होण्यास सुरुवात झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. यादरम्यान देशात कोरोना संसर्गाला सुरुवात झाली नसल्याचे माहिती चुकीचे असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. आपला देश खूप आहे आणि त्यादृष्टीने प्रभाव कमी आहे. समूह संसर्ग भारतात झाला नसल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव यांनी दिली आहे.

लॉकडाउन लागू केल्याने कोरोनाचा वेगाने होणारा फैलाव रोखण्यात यश मिळाल्याचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी अधोरेखित केले. कोरोनाचा फैलाव शहरी भागात थोडा जास्त झाला आहे. पण लॉकडाउन करत आपण जी पावले उचलली त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आणि वेगाने त्याचा होणार फैलाव थांबवण्यात यश मिळाल्याचे बलराम भार्गव यांनी सांगितले आहे.

देशातील विविध राज्यांनी त्यासंदर्भात सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे असून त्यात शिथीलता आणली जाऊ शकत नाही. राज्यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पाळत ठेवण्यासोबतच नव्या योजना आखण्याची गरज असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना आरोग्य मंत्रालयाचे सह-सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशात आज रिकव्हरी रेट ४९.२१ टक्के आहे. उपचार घेऊन बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा जास्त असून ही दिलासा देणारी गोष्ट असल्याचे म्हटले आहे. कोरोनासंबंधी रोज नवा रेकॉर्ड देशात होताना दिसत आहे. कोरोनामुळे गेल्या २४ तासांत ३५७ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात एवढ्या मृत्यूची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक ९९९६ रुग्णांची नोंद झाली.

Leave a Comment