‘मुलगा कितीही पुढे गेला तरी प्रत्येक वडिलांना कमीच वाटतो’,फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर

चक्रीवादळामुळे कोकणाचे मोठे नुकसान झाले. याच पार्श्वभूमी राजकीय नेते कोकणचा दौरा करून नुकसानीची पाहणी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील कोकण दौरा करत नुकसानीची पाहणी केली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर आले तर चांगलेच होईल. येथे किती नुकसान झाले आहे, ते सर्वांना कळाले पाहिजे. ते विदर्भातून येतात. त्यांचा समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असे म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला होता. आता देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

फडणवीस म्हणाले की, पवार जे बोलले ते मी ऐकले. मी अनेकदा बारामतीला गेलो आहे, मात्र तेथे मला कधी समुद्र दिसला नाही. पवार हे वडिलांच्या वयाचे आहेत, त्यामुळे मुलगा कितीही पुढे गेला तरी प्रत्येक वडिलांना आपल्या पोराला कमी समजते असे वाटत असते.

पवारांना कदाचित माझ्या खांद्यावरून वांद्र्याच्या सीनियर आणि बारामतीच्या ज्यूनियरवर बंदूक चालवायची असेल व काही तरी करा असे त्यांना सांगायचे असेल, असे म्हणत फडणवीसांनी पवारांना प्रत्युत्तर दिले.

Leave a Comment