हेल्थ पासपोर्ट म्हणजे काय?

फोटो साभार जागरण

जगभरात अनेक देशांनी करोना महामारी बरोबरची लढाई जिंकली असून आपल्या सीमांची द्वारे अन्य देशातील नागरिकांसाठी खुली करण्यास सुरवात केली आहे. मात्र दुसऱ्या देशातून नागरिकांनी त्यांच्या देशात पर्यटनासाठी यावे असे आवाहन करताना व्हिसाचे नियम अधिक कडक केले आहेत. त्यानुसार आता या देशात प्रवेश करताना पर्यटकांना हेल्थ पासपोर्ट किंवा इम्युनिटी पासपोर्ट बंधनकारक करण्याबाबत गंभीर विचार सुरु केला आहे.

काय आहे हा पासपोर्ट? तर ते एक प्रकारचे प्रवाशाच्या स्वास्थ्याचे प्रमाणपत्र आहे. प्रवाशाला करोना संक्रमण नाही ना याचा उल्लेख या प्रमाणपत्रात करावा लागेल. करोना होऊन त्यातून प्रवासी बरा झालेला असेल तर त्यांना पुन्हा करोनाचा धोका नाही याची खात्री या प्रमाणपत्रात द्यावी लागेल. अनेक देशांनी प्रवासी तसेच त्यांच्या नागरिकांना कार्यालयात कामावर हजर होताना हेल्थ सर्टिफिकेट बंधनकारक करण्याविषयी विचार चालविला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने एकदा करोना होऊन गेलेल्या लोकांपासून दुसऱ्या लोकांना संक्रमण होण्याचा धोका नाही हे अजून सिद्ध झालेले नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हेल्थ पासपोर्टच विचार गंभीरपणे केला जात आहे. ब्रिटनमधील टेक कंपन्या हेल्थ पासपोर्ट बद्दल निर्णय घेण्याच्या अंतिम टप्प्यात असून कर्मचारी कामावर परत रुजू होतील तेव्हा पासपोर्ट, प्रमाणपत्र आणि चेहऱ्याच्या बायोमेट्रिक्सच वापर करण्याचा विचार करत आहेत असे समजते.

Leave a Comment