आतापर्यंत जगभरातील चार लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू


मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये कोरोनाचा कहर अद्याप कायम असून जगभरात मागील तासात 1 लाख 21 हजार नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 4757 ने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जगभरात जवळपास 73 लाख लोकांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले असून यापैकी 4 लाख 12 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 36 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात जवळपास 58 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त 8 देशांमधून समोर आले आहेत. या देशांमध्ये कोरोना पीडितांची संख्या 43 लाख एवढी आहे.

अमेरिकेला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. आतापर्यंत 20 लाख लोकांना अमेरिकेत कोरोनाची लागण झाली आहे. तर एक लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण कोरोनाचे सध्या ब्राझील हे नवे केंद्र असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेपेक्षा जास्त रुग्ण आणि मृत्यूंची नोंद ब्राझीलमध्ये केली जात आहे. मागील 24 तासांमध्ये ब्राझीलमध्ये 3,139 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1185 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये 19056 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 1093 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये संसर्ग वेगाने पसरत आहे. ब्राझीलनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रशिया आणि भारतात सर्वाधित दिसून येत आहे.

कोरोना बाधितांची ब्राझील, रूस, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरूमध्ये संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त सात देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. तर पाच देश (अमेरिका, इटली, फ्रान्स, ब्रिटन, ब्राझील) असे आहेत. जिथे 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.14 लाखांच्या पार पोहोचला आहे. तर भारताचा टॉप-6 देशांमध्ये समावेश झाला आहे.

Leave a Comment