सर्कशीमध्ये सर्व प्राणी, केवळ एका जोकरची गरज – शरद पवारांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेला दिले उत्तर - Majha Paper

सर्कशीमध्ये सर्व प्राणी, केवळ एका जोकरची गरज – शरद पवारांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेला दिले उत्तर

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपुर्वी कोरोना संसर्गावरून महाराष्ट्र सरकारवर टीका करत येथे सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू असल्याचे म्हटले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, या सर्कशीमध्ये सर्व प्राणी आहेत, केवळ एका जोकरची गरज आहे. चक्रीवादळामुळे कोकण भागातील नुकसान झाले होते. येथील पाहणी करण्यासाठी शरद पवार पोहचले होते, त्यावेळी त्यांनी राजनाथ सिंह यांचे टीकेला उत्तर दिले.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देखील राजनाथ सिंह यांच्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले की, हे हास्यास्पद आहे की जे सरकार स्वतः रिंगमास्टरच्या हंटरने चालत आहे. ते लोकशाहीच्या मार्गाने चालणाऱ्या सरकारला सर्कस म्हणत आहेत. असे वाटते की राजनाथ सिंह आपल्या अनुभवाचे बोल बोलत आहे. आयसीएमआरने कोरोना व्हायरसच्या लढ्यात मुंबई मॉडेलचे कौतुक केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई काँग्रेसचे नेते चरण सिंह सापरा हे देखील राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, जे लोक सर्कस पाहत आहेत त्याला केंद्र सरकार म्हणतात. ते लोकांच्या प्रती असवेंदनशील आहेत. या सर्कसमध्ये जोकरांची संख्या अधिक आहे.

Leave a Comment