कोरोनात ‘मायक्रो वेडिंग’चा ट्रेंड, आता 2 लाखात आटोपा लग्न

लग्न समारंभाच्या हंगामात कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे वेडिंग इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट देत लग्नास परवानगी दिल्यानंतर वेडिंग प्लॅनर्स देखील नवीन संकल्पना घेऊन आले आहेत. लग्नाची जुनी परंपरा परत आली असून, केवळ जवळच्या नातेवाईकांनाच बोलवत आहेत. घराच्या छतावर, लॉन अथवा गार्डनमध्ये कार्यक्रम करत आहेत. आता लग्नात लाईव्ह स्ट्रिमिंग, मास्क, सॅनिटायझर देखील सवयीचे झाले आहे. वेडिंग प्लॅनर्सचे म्हणणे आहे की कोव्हिड-19 नंतर लग्नाच्या जुन्या परंपरा परतत आहेत. मायक्रो वेडिंगची नवीन संकल्पना ट्रेंडमध्ये असून, लोक मोजक्याच नातेवाईकांना लग्नात बोलवत आहेत. घराच्या अंगणातच लग्न करत आहेत. डेकोरेशनमध्ये देखील कमी खर्च करत आहेत.

Image Credited – navbharattimes

वेडिंग प्लॅनर्सनुसार, सरकारने केवळ 50 लोकांनाच लग्नात बोलवण्याची परवानगी दिली आहे. अशा स्थितीमध्ये ज्यांच्या घरात लॉन अथवा मोठी जागा आहे ते तेथेच लग्न करत आहेत. 50 लोकांसाठी मायक्रो वेडिंग पॅकेज बनवले जात आहे. 2 ते 2.5 लाख रुपयांच्या या पॅकेजमध्ये सर्व गोष्टींचा समावेश आहे. यात वरातीसाठी नाश्ता, जेवण, स्वीट डिशचा देखील समावेश आहे. यात पाहुण्यांना डिजिटल पत्रिका देखील पाठवत आहे. लग्नाच्या ठिकाणी सॅनिटायझेशन व इतर उपकरण लावत आहे.

Image Credited – navbharattimes

प्लॅनर्सनी सांगितले की, आता लग्नासाठी दक्षिण भारतीयांप्रमाणे एक छोटासा चांगला मंडप तयार केला जातो. लग्नासाठी मेन्यू देखील कमी असतो. अलिशान व शो ऑफ पदार्थ हटवले आहेत. जेवण वाढताना केवळ डिस्पोजल वापरले जात आहे. लग्नात 50 लोक सहभागी होत आहेत. तर इतर नातेवाईक फेसबुक, युट्यूब आणि इंस्टाग्राम लाईव्हद्वारे सहभागी होत आहे. वेडिंग ड्रेससोबत लोक मॅचिंग मास्क देखील घेत आहेत. पाहुण्यांना मास्क, सॅनिटायझर, हातमोजे, टिशू दिले जात आहेत.

Leave a Comment