अंतराळ प्रकल्पासाठी खासगी कंपन्या घेऊ शकणार इस्रोचे सहाय्य

फोटो साभार झी न्यूज

अंतराळ संदर्भातले प्रकल्प राबविण्यासाठी भारतात खासगी क्षेत्रातील कंपन्या आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे सहाय्य घेऊ शकणार आहेत. म्हणजेच भारतात खासगी कंपन्यांना अंतराळाची द्वारे खुली केली गेली आहेत असे केंद्रीय अंतराळ आणि अणुउर्जा राज्य मंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले.

१० दिवसापूर्वी अमेरिकेच्या स्पेस एक्सने नासाच्या मदतीने दोन अंतराळविरांसह त्यांचे ड्रॅगन २ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठविले आहे. त्यासाठी वापरले गेलेले रॉकेट फाल्कन ९ अॅलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीने तयार केले होते. भारतातही खासगी कंपन्या इस्त्रो केंद्रातील सुविधा त्यांच्या अंतराळ प्रकल्पांसाठी वापरू शकतील.

भविष्यात अंतराळ प्रकल्पासाठी इच्छुक असलेल्या कंपन्या स्पेस ट्रॅव्हल क्षेत्रात यामुळे उतरू शकणार आहेत असे सांगून जितेंद्र सिंग म्हणाले, लवकरच खासगी क्षेत्र, अंतराळ क्षेत्रात सरकारचा महत्वाचा साथीदार म्हणून उदयास येईल अशी आशा आहे. खासगी कंपन्याना सॅटेलाइट लाँचिंग व स्पेस बेस्ड सेवा पुरविण्याची परवानगी देण्यात येत आहे.

भारताचे पाहिले मानव स्पेस मिशन गगनयान साठी अंतराळवीरांची निवड पूर्वीच झाली असून त्यांना रशियात प्रशिक्षण दिले जात आहे. करोनामुळे हे प्रशिक्षण थोडे लांबल्याचे जितेंद्रसिंग यांनी सांगितले.

Leave a Comment