नेटफ्लिक्सवर रिलीज होणार जान्हवीचा ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’


2018 मध्ये धडक या चित्रपटातून अभिनेत्री जान्हवी कपूरने बॉलिवूड पदार्पण केले होते. पण त्यानंतर तिचा एकही चित्रपट रिलीज झालेला नाही. दरम्यान कारगिल युद्धात सामील झालेल्या भारतीय पायलट गुंजन सक्सेना हिच्या बायोपिकबद्दल मागच्या काही काळापासून जोरदार चर्चा सुरू आहे आणि जान्हवी या चित्रपटात त्यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी जान्हवी प्रचंड मेहनत घेतली आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे या चित्रपटाचे रिलीज अडकले होते. पण हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून जान्हवीचा नवा अवतार प्रेक्षकांना यात पाहायला मिळणार आहे.


तब्बल दोन वर्षांनंतर जान्हवी कपूर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण ती यावेळी खूपच वेगळ्या अंदाजात आपल्यासमोर येत आहे. लवकरच जान्हवीचा गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल हा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचा माहिती स्वतः जान्हवीने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. आपल्या इन्स्टाग्रामवर जान्हवीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात बॅकग्राऊंडला जान्हवीचा आवाज असून व्हिडीओमध्ये गुंजन सक्सेना यांच्या लाइफमधील काही क्षण दाखवण्यात आले आहेत.


जान्हवीने हा व्हिडीओ शेअर करताना हा चित्रपट माझ्यासाठी फक्त चित्रपट नाही. हा एक प्रवास आहे, ज्याने मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले. एक अशी मुलगी जिने सर्वांना साध्या सोप्या कृतीतून आपल्या स्वप्नाच्या मागे धावायला शिकवले. हा प्रवास तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.

लवकरच ऑनलाइन प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर जान्हवी कपूरचा हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर गुंजन सक्सेना यांचा जीवनप्रवास उलगडला जाणार आहे. शरण शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून जान्हवी कपूर सोबतच या चित्रपटात पंकज त्रिपाठी आणि अंगद बेदी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Leave a Comment