जॉर्ज फ्लॉयड मृत्यू प्रकरण : आरोपी पोलिसाला 7.50 कोटींचा जामीन मंजूर

अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या माजी पोलीस अधिकारी डेरेक शॉविनला मिनियोपोलिसच्या न्यायाधीशांना जामीन मंजूर केला असून, यासाठी त्यांनी जामीनाची रक्कम 1 मिलियन डॉलर (7.50 कोटी रुपये) निश्चित करण्यात आली आहे. डेरेक शॉविनवर सेकेंड डिग्री मर्डर आणि मनुष्यवधाचा आरोप आहे.

हेन्नेपिन काउंटी जिल्हा न्यायालयाने 44 वर्षीय शॉविनला काही अटींसह जामीनाची रक्कम1 मिलियन डॉलर (7.50 कोटी रुपये) आणि विना अटींसह जामीनाची रक्कम 1.25 मिलियन डॉलर (9.44 कोटी रुपये) निश्चित केली आहे. अटींमध्ये बंदुक सरेंडर करणे, राज्य सोडून जाऊ नये, कायदा अमंलबजावणी संस्थेत काम करू नये व कोणत्याही परिस्थितीमध्ये जॉर्ज फ्लॉयडच्या कुटुंबाशी संपर्क साधू नये या गोष्टींचा समावेश आहे. आरोपाची गंभीरता आणि सार्वजनिकरित्या या मुद्यांबाबत लोकांमध्ये असलेला आक्रोश लक्षात घेऊन ही रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

शॉविनसह असलेले इतर तीन पोलीस अधिकाऱ्यांना हत्येस मदत करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आहे. या चारही आरोपींना नोकरीवरून काढण्यात आलेले आहे.

Leave a Comment