राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत 2553 नवीन रुग्णांची वाढ


मुंबई : काल दिवसभरात राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत 2553 नवीन रुग्णांची वाढ झाल्यामुळे राज्यातील कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 88 हजार 528 एवढी झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे काल एका दिवसात तब्बल 1661 कोरोनामुक्त झालेल्यांना घरी सोडण्यात आले आहे, तर आता पर्यंत राज्यभरातील 40,975 हजार डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यात रुग्ण बरे होण्याचा वेग वाढताना दिसत आहे. सध्या 44 हजार 374 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजारांवर गेला आहे.

काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 71 पुरुष तर 38 महिला आहेत. काल नोंद झालेल्या 109 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 59 रुग्ण आहेत तर 44 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 6 जण 40 वर्षांखालील आहे. या 91 रुग्णांपैकी 79 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

काल झालेल्या मृत्यूपैकी 32 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 3 मे ते 5 जून या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 77 मृत्यूपैकी मुंबई 51, औरंगाबाद 8, रत्नागिरी 3, धुळे 4, अहमदनगर, भिवंडी, जळगाव, जालना, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर आणि वसई विरार येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment