जगभरात कोरोनाचे थैमान कायम; 70 लाखांहून अधिक कोरोनाबाधित


नवी दिल्ली – जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोना या जीवघेण्या व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असून या व्हायरसमुळे जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यातच आता जगभरात या व्हायरसमुळे बाधित झालेल्यांची संख्या 70 लाखांच्या पार पोहोचली आहे. तसेच या कोरोनामुळे जगभरात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4 लाखांहून अधिक झाली आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकेडवारीनुसार जगभरातील 213 देशांमध्ये आज सकाळपर्यंत एकूण 70 लाख 81 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यापैकी 4 लाख 5 हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, 34 लाख 55 हजार 099 लोकांनी या जीवघेण्या रोगावर यशस्वीरित्या मात केली आहे.

जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेवर कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झाला आहे. अमेरिकेमध्ये एकूण 1 लाख 12 हजार 469 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना बाधितांचा आकडा 20 लाख 07 हजार 449 वर पोहोचला आहे. त्यानंतर कोरोना बाधितांची सर्वाधिक संख्या ब्राझीलमध्ये आहे. ब्राझीलमध्ये 6 लाख 91 हजार 962 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर रशियामध्ये 4 लाख 67 हजार 673 रुग्ण आढळले असून रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात संसर्ग झालेल्यांची संख्या वेगाने वाढत आहे.

ब्राझील, रुस, स्पेन, इटली आणि भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. त्याचबरोबर जगात असे आठ देश आहेत, जिथे एक लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत. अमेरिकेसह या 15 देशांमध्ये एकूण 54.62 लाख रुग्ण आहेत. पाच देश (अमेरिका, इटली, फ्रान्स, ब्रिटन, ब्राझील) ज्यांमध्ये 30 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.12 लाखांच्या पार पोहोचला आहे. चीन टॉप-17 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. तर भारताचा समावेश टॉप-6 कोरोना बाधित देशांच्या यादीत झाला आहे.

Leave a Comment