दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरात होऊ लागले आहे लोकल ट्रान्समिशन


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने होणाऱ्या वाढीवर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरात लोकल ट्रान्समिशन होऊ लागले आहे. त्याचबरोबर आपल्या देशात 10 ते 12 अशी शहरे आहेत, ज्याठिकाणी लोकल ट्रान्समिशनची शक्यता जास्त असल्याचे म्हटले आहे. तसेच सध्यातरी देशातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आहे. पण आगामी काळात देशातील विविध राज्यात मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा देखील अंदाज वर्तवला आहे.

इंडिया टुडे या वृत्तवाहिनीशी साधलेल्या संवादात डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, जेव्हा देशातील कोरोनाबाधितांची नवी प्रकरणे कमी होऊ लागतील, तेव्हा आपण आता आम्ही यावर नियंत्रण ठेवत आहोत, असे म्हणून शकतो. पण आपल्या देशाच्या लोकसंख्येमुळे साहाजिकच आपल्या येथे जास्त प्रकरणे असणे स्वाभाविक आहे. डॉ. गुलेरिया पुढे म्हणाले, आपल्या देशात 10 ते 12 शहरे अशी आहेत जेथून 70 ते 80 टक्के प्रकरणे समोर येत आहेत. अशात या शहरांवर आपल्याला लक्ष केंद्रित केले पाहिजे. या शहरांसाठी नियोजन करावे लागेल, तेव्हा आपण चेन ऑफ ट्रान्समिशन रोखू शकतो. देशातील या राज्यांमध्ये रोज 10 हजारच्या जवळपास नवी प्रकरणे समोर येत आहेत. देशभरातील संक्रमित रूग्णांची संख्या सध्या वाढून 2.46 लाखपेक्षा जास्त झाली आहे.

Leave a Comment