बॉलीवूड अनलॉक, विक्की कामावर परतला

फोटो साभार इंडियन एक्सप्रेस

बॉलीवूड अनलॉक झाल्याची चाहूल उरीफेम अभिनेता विकी कौशल यांच्या इन्स्टाग्राम वरील पोस्ट मुळे लागली असून विकीने शहीद सरदार उधमसिंग संबंधित बातमी शेअर केली आहे. त्याने या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन ८ जून पासून सुरु होत असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच विक्की कामावर परतत आहे. करोना कोविड मुळे सुमारे ७० दिवसांचा लॉक डाऊन पाळल्यावर आता अनलॉक प्रक्रिया सुरु झाली असून बॉलीवूड नगरीही अनलॉक होऊ लागली आहे. २० मार्च पासून बंद झालेली चित्रपट, टीव्ही मालिका शुटींग आता सरकारच्या सर्व अटी पाळून पुन्हा सुरु होऊ लागली आहेत.

विक्कीने बॉलीवूड अनलॉकची माहिती एखादी कविता लिहावी तशी दिली आहे. तो लिहितो,

‘जब प्रकृतीने इशारा किया, हमने सुना, तेज भागते हुये हमने स्लो मोशनमे आनेके लिये गिअर बदले, अब फिरसे एक बार बुलावा आया है, एक उत्साह है, लेकिन सावधानी के साथ सब कुछ फिरसे शुरू करनेकी भूख. इस भावनाके साथ शुरू करते है, फिर से, कल से सरदार उघमसिंग.

हा चित्रपट २ ऑक्टोबरला रिलीज होणार होता मात्र लॉकडाऊन मुळे काम बंद करावे लागल्याने तो आता १५ जानेवारी २०२१ मध्ये रिलीज होणार आहे. जालियनवाला बाग नरसंहार घटनेवर तो आधारित आहे. १३ एप्रिल १९१९ मध्ये जालियनवाला बागेत जो अमानुष गोळीबार झाला त्याचा उधमसिंग हे प्रत्यक्ष साक्षीदार होते. २१ वर्षानंतर त्यांनी या अन्यायाचा बदला घेताना १३ मार्च १९४० ला पंजाब गव्हर्नर मायकेल ओ एवायर यांचा लंडन मध्ये गोळी घालून जीव घेतला. त्याबद्दल उधमसिंग याना ३१ जुलै १९४० रोजी फाशी दिली गेली होती.

Leave a Comment