कोरोनामुळे जगभरातील बळींची संख्या 4 लाखांवर, तर जवळपास 70 लाख बाधित


मुंबई : जीवघेण्या कोरोना व्हायरसचे थैमान जगभरात अद्याप सुरुच असून जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 70 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. तर या जीवघेण्या रोगाने जगभरात आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 69 लाख 73 हजार 427 लाख लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 02 हजार 049 वर पोहोचली आहे. तर जगभरातील 34 लाख 11 हजार 118 जणांनी या रोगावर यशस्वीरित्या मात केली आहे. जगातील 76 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 14 देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 52 लाखांच्या घरात आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार भारत रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत जगात सहाव्या क्रमांकवर आहे. कोरोनाचे भारतात 2,46,622 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 6,946 बळी गेले आहेत. भारतात सध्या 1,20,981 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 1,18,695 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अमेरिकेला जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेत 19 लाख 88 हजार 544 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर कोरोनामुळे 1 लाख 12 हजार 096 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत कोरोनामुळे 40,465 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांची संख्या 2,84,868 एवढी आहे. अमेरिकेनंतर कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ब्राझीलमध्ये 6 लाख 75 हजार 830 कोरोनाबाधित आहेत तर 36,026 लोकांचा मृत्यू झालाय. कोरोनामुळे स्पेनमध्ये 27,135 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2,88,390 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 33,846 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 234,801 हजार एवढा आहे.

अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत हे सात देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दोन लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखाहून अधिक बळी गेले आहेत. इटली, ब्रिटन, ब्राझील या देशांमध्ये कोरानामुळे 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment