आरोग्य मंत्रालयाच्या तज्ञांचा निष्कर्ष; 'या' महिन्याच्या मध्यापर्यंत होईल कोरोनाचा अंत - Majha Paper

आरोग्य मंत्रालयाच्या तज्ञांचा निष्कर्ष; ‘या’ महिन्याच्या मध्यापर्यंत होईल कोरोनाचा अंत


नवी दिल्लीः देशावर ओढवलेल्या कोरोना विरुद्धच्या लढाईत आता देशातील जनजीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण हे सर्व होत असतानाच आपल्यापैकी अनेकांचा या जीवघेण्या रोगापासून सुटका होईल हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे. त्यातच आता या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. एका गणितीय मॉडेलच्या आधारे आरोग्य मंत्रालयाच्या तज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की, भारतातील कोरोनाचा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत अंत होईल. त्याचबरोबर या आरोग्य शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, जेव्हा भारतातील कोरोनामुक्त झालेल्या आणि कोरोनामुळे बळी पडलेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रूग्णांच्या संख्येच्या बरोबर पोहचेल तेव्हा कोरोना शिखरावर असेल आणि त्यानंतर रुग्णांची संख्या वेगाने कमी होईल आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत भारतातून कोरोना हळूहळू गायब होईल.

भारतात सध्या कोरोनाची 1,15,942 अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. म्हणजेच देशातील वेगवेगळ्या रुग्णालयात एवढ्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर 1,14,072 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर या रोगामुळे 6642 जणांनी आपला जीव गमावला आहे. ही गणना आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयात उपमहासंचालक दिलीप कुमार आणि दीप्ती सहायक संचालक रुपाली राय यांनी केली असून एपिडेमिओलॉजी इंटरनॅशनल या सायन्स मासिकामध्ये त्यांचा अभ्यास प्रकाशित झाला आहे.

दोन्ही तज्ञांनी भारतातील कोरोनाच्या स्थितीचा अंदाज लावण्यासाठी बॅले मॅथेमॅटिकल मॉडेलचा उपयोग केला आहे. या मॉडेल अंतर्गत, रोगाचा निष्कर्ष सक्रिय आणि बरे झालेल्या रूग्णांच्या आधारे निष्कर्ष काढला जातो. त्या आधारावर हे मॉडेल कार्य करते की जोपर्यंत एखाद्या रूग्णाला लागण होते, तोपर्यंत तो नवीन लोकांना संक्रमित करू शकतो. अशा परिस्थितीत एकदा बरे झालेल्या आणि जीव गमावलेल्या लोकांची संख्या सक्रिय रूग्णांच्या संख्येपेक्षा जास्त झाली की, संसर्ग कमी होऊ लागतो.

आपल्या विश्लेषणामध्ये दोन्ही शास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की, 2 मार्चपासून भारतात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि तेव्हापासूनच या घटनांमध्ये वाढ होत गेली आहे. त्यांच्या अभ्यासानुसार, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत बरे झालेले आणि आपला जीव गमावलेल्या एकूण लोकांची संख्या सक्रिय रूग्णांच्या समकक्षापर्यंत पोहचेल्यानंतर महामारीचा प्रादुर्भाव कमी होईल.

Leave a Comment