उद्यापासून मुंबईतील सर्व सामान्यांसाठी धावणार ‘बेस्ट’


मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला कोरोना या जीवघेण्या व्हायरसने आपल्या विळख्यात घेतले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. पण आता राज्यातील ठाकरे सरकारच्या मिशन बिगिन अगेननुसार मुंबईतील सर्व सामान्यांचे जनजीवन पुन्हा रुळावर आणण्यासाठी बेस्टने देखील कंबर कसली असून उद्यापासून बेस्टच्या बस सर्वसामान्यांसाठी धावण्यास सुरुवात होणार आहे.

यापूर्वीच्या लॉकडाऊन टप्प्यांमध्ये केवळ मंत्रालय व अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी बेस्टच्या फेर्‍या सुरु होत्या. सुमारे दीड हजार बसच्या फेर्‍या सध्या सुरु आहेत. सोमवारी त्यात २३०० पर्यंत वाढ करण्यात येणार आहे. या बसमध्ये प्रत्येक सीटवर एका प्रवाशाला बसण्यास परवानगी असेल व पाच जण उभे राहून प्रवास करु शकणार आहे. प्रवाशांनी भरभरुन वाहणार्‍या बेस्टच्या बसगाड्या पाहण्याची सर्वांना सवय आहे. पण जनजीवन कोरोनाच्या संकटात पुन्हा सुरु करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून बसगाड्या व एसटीची वाहतूक सुरु करण्यात येत आहे. सोमवारी २ हजार ३०० फेर्‍या होणार असून त्यानंतर त्या साडेतीन हजारांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

Leave a Comment