व्हिडीओ : भारतात जॉर्ज फ्लॉयडसारखे प्रकरण, पोलिसाने गुडघ्याने दाबली व्यक्तीची मान

राजस्थानच्या जोधपूर येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी एका व्यक्तीला जमिनीवर पाडून मारताना दिसत आहेत. जोधपूर पोलिसांच्या या क्रूरपणाची सोशल मीडियावर टीका होत आहे. व्हिडीओ एक पोलीस कर्मचारी व्यक्तीच्या मानेवर गुडघा टेकून बसला आहे. तर अन्य कर्मचाऱ्यांनी जमिनीवर पडलेल्या व्यक्तीला पकडले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूची आठवण आली. हा प्रकार अमेरिकेतील प्रकारासारखाच दिसत आहे.

हे प्रकरण जोधपूरमधील देवनगर पोलीस स्टेशन भागातील असल्याचे सांगितले जात आहे. लॉकडाऊनमध्ये मास्क न घातल्यामुळे पोलीस लोकांवर कारवाई करत होते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जोधपूर डीसीपी (वेस्ट) प्रीति चंद्रा यांनी म्हटले की, पोलिसांनी स्वतःच्या रक्षणासाठी असे केले. जेणेकरून व्यक्ती हल्ला करू शकणार नाही.

https://twitter.com/archit0623/status/1268811388354322433

दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्तीला विना मास्क लावता फिरताना पकडल्यानंतर ही घटना घडली. पोलिसांनी आरोप केला आहे की जेव्हा व्यक्तीला पकडले तेव्हा त्याने हल्ला केला. चंद्रा यांनी म्हटले की, एका कॉन्स्टेबलने व्यक्तीने मास्क नव्हता घातला त्यावेळी त्याचा फोटो काढला. मास्क का नाही घातला असे विचारले असता व्यक्तीने धमकी दिली की डोळे फोडून टाकेल. व्यक्तीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली असून, त्याला अटक केले आहे.

याआधी अशाच प्रकारे अमेरिकेत पोलीस कर्मचाऱ्याने व्यक्तीच्या गळ्यावर गुडघा टेकून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment