सॅनिटायझर लावून मंदिरात येण्यास या पुजाऱ्यांचा विरोध

सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथिल करत 8 जूनपासून धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. धार्मिक स्थळांसाठी सरकारने गाईडलाईन देखील जारी केली आहे. गाईडलाईननुसार मंदिराच्या मुख्य द्वारावर सॅनिटायझर मशीन लावलेली असावी. प्रवेशाआधी लोक हात सॅनिटायझकरून मंदिरात प्रवेश करतील. मात्र आता याला भोपाळ मंदिराच्या पुजाऱ्यांनी विरोध केला आहे.

मंदिराच्या पुजाऱ्यांनी मात्र सॅनिटायझरमध्ये अल्कोहल असल्याचे म्हणत याला विरोध केला आहे. भोपाळच्या मां वैष्णवधाम नव दुर्गा मंदिराचे पुजारी म्हणाले की, शासनाचे कार्य गाईडलाईन जारी करणे आहे. मात्र मंदिरात सॅनिटायझरचा आम्ही विरोध करतो. सॅनिटायझरमध्ये अल्कोहल असतो.

मंदिराचे पुजारी चंद्रशेखर तिवारी म्हणाले की, आपण दारू पिऊन मंदिरात प्रवेश करू शकत नाही. तर अल्कोहलने हात सॅनिटायझ करून कसे प्रवेश करू शकतो. तुम्ही हात धुवण्याची मशीन सर्व मंदिराबाहेर लावा, साबण ठेवा आम्ही स्विकार करतो. असेही मंदिरात प्रत्येक व्यक्ती घरून अंघोळ करूनच येत असतो.

Leave a Comment