आता नियम आणि अटीनुसारच होणार देवदर्शन, अशी आहे नियमावली


नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये आता केंद्र सरकारकडून बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्यात येत आहे. दरम्यान अनलॉक 1 मध्ये केंद्रसरकारने मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल उघडण्यास परवानगी दिली असून काही राज्यांमधील मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल येत्या आठ जूनपासून खुली होणार आहेत. पण महाराष्ट्रात अद्याप असली कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. दरम्यान केंद्र सरकारने काल संध्याकाळी प्रार्थनास्थळांसाठी काही मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. त्यानुसार आता आपल्याला पूर्वीसारखे प्रार्थनास्थळांमध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर बिनधास्तपणे वावरता येणार नाही. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे.

प्रार्थनस्थळांसाठी असलेली नियमावली

  • प्रार्थनास्थळाच्या प्रवेशद्वारावर हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर आणि शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल स्क्रिनिंगची सुविधा आवश्यक आहे.
  • आजाराची कुठलीही लक्षण नसणार्‍या तंदुरुस्त व्यक्तीलाच प्रार्थनास्थळाच्या परिसरात प्रवेश दिला जाणार आहे.
  • त्याबरोबरच चेहर्‍यावर मास्क बंधनकारक करण्यात आला असून त्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे.
  • पोस्टर आणि स्टँण्डीच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या उपायोजनासंदर्भात माहिती देण्यात यावी.
  • प्रार्थनास्थळांमध्ये दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने पोस्टर/स्टँण्डी ठेवण्यात येण्याची सूचना करण्यात आली आहे.
  • कोरोना व्हायरस रोखण्यासाठी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून काय करणे आवश्यक आहे? त्याबद्दल जनजागृती करण्यास सांगण्यात आले आहे.
  • प्रार्थनास्थळांमधील मुर्ती, पवित्रग्रंथांना स्पर्श करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
  • मंदिराने कॉमन अंथरी टाळावी त्याऐवजी भाविकांनी स्वत:सोबत येताना अंथरी किंवा कापड आणावे, जे जाताना आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतात.

Leave a Comment