व्हिडीओ : अमेरिकेत पोलिसांचा क्रूरपणा, वृद्ध निदर्शकाचे फुटले डोके

अमेरिकेत एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांद्वारे मृत्यू झाल्याने निदर्शन सुरू आहे. आता आणखी एका घटनेने अमेरिकन पोलिसांचे क्रू वर्तन समोर आले आहे. न्यूयॉर्क पोलिसांनी एका निदर्शन करणाऱ्या निशस्त्र वृद्धाला ढकलल्याने जमिनीवर पडलेल्या व्यक्तीचे डोके फुटले. या निदर्शक बेशुद्ध पडला असताना, रक्त निघत होते हे पाहून देखील पोलीस कर्मचारी मदतीसाठी थांबले नाहीत.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आता पोलीस कमिश्नरने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दुखापतग्रस्त व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे

दरम्यान, जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसाचार उफाळला आहे. देशभरात 10 हजार लोकांना अटक केले असून, 12 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

Leave a Comment