गर्भवती हत्तीणीच्या दोषींची माहिती देणाऱ्यांना मिळणार लाखोंचे इनाम

केरळच्या मलप्पुरम येथे एका गर्भवती हत्तीणीला फटाके भरलेले अननस खाऊ घातल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर याबाबत आक्रोश व्यक्त केला जात आहे. फटाक्याने भरलेले अननस खाल्ल्याने हत्तीण जखमी झाली होती. यामुळे तीन दिवस काहीही खाऊ शकली नाही व अखेर तिचा मृत्यू झाला.

हत्तीणीसोबत घडलेल्या या अमानवीय घटनेनंतर सर्वच स्तरातून या घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. काही संस्थांनी यास जबाबदार असणाऱ्यांचे नाव सांगणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे. वाईल्ड लाइफ एओएस एनजीओ या गुन्हेगारांची माहिती देणाऱ्यांना 1 लाख रुपये तर ह्युमन सोसायटी आंतरराष्ट्रीय/इंडिया 50 हजार रुपये देणार आहे.

आणखी वाचा : अमानवीय ! फटाक्यांनी भरलेले अननस खाऊ घातल्याने गर्भवती हत्तीणीचा मृत्यू

वाईल्ड लाईफ एसओएसने म्हटले की, हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले अननस खाऊ घालणाऱ्याची सूचना व याबाबत पुरावे देणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपये बक्षीस दिले जाईल. लोक एलिफँट हॉटलाईन – 9971699727 अथवा ईमेल info@wildlifesos.org वर सूचना देऊ शकतात. ह्युमन सोसायटी आंतरराष्ट्रीय संस्थेने देखील दोषींचे नाव सांगणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल व 50 हजार रुपये बक्षीस देण्यात येईल असे म्हटले आहे. संस्थे अशा प्रकारे प्राण्यांसोबत घडणाऱ्या घटनेची माहिती देण्यासाठी 7674922044 व्हॉट्सअ‍ॅप नंबर जारी केला आहे. दरम्यान, या घटनेबाबत केरळच्या वन विभागाने तपास सुरू केला आहे.

Leave a Comment