केरळमधील एक अमानवीय घटना समोर आली असून, येथे एका गर्भवती हत्तीणीला फटाके भरलेले अननस खाऊ घातल्याने तिचा मृत्यू झाला आहे. हे फटाके हत्तीणीच्या पोटात फुटल्याने तिच्यासह पोटातील पिल्लाचा देखील मृत्यू झाला. या घटनेबाबत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात असून, यासाठी जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा देण्याची मागणी बॉलिवूड कलाकारांनी देखील केली आहे.
अमानवीय ! फटाक्यांनी भरलेले अननस खाऊ घातल्याने गर्भवती हत्तीणीचा मृत्यू
केरळच्या मलप्पुरम येथे एक हत्तीण जेवणाच्या शोधात जंगलाच्या बाहेर आली होती. गावात भटकल्यानंतर काही लोकांनी तिला अननसमध्ये फटाके भरून खायला घातले. भूकेने तळमळलेल्या त्या हत्तीणीने हे अननस खाल्ले, मात्र फटाके पोटात फुटले. या घटनेत हत्तीण पुर्णपणे जखमी झाली होती.

याची माहिती मिळताच बचाव पथ तेथे पोहचली. मात्र काहीवेळातच हत्तीणीने प्राण सोडले. बचाव पथाचे सदस्य असलेले वन अधिकारी मोहन कृष्णन यांनी फेसबुकवर लिहिले की, तिने सर्वांवर विश्वास ठेवला. जेव्हा अननस खाल्ला आणि काहीवेळातच फटाके पोटात फुटल्याने तिला समस्या जाणवू लागली. हत्तीण स्वतःसाठी नाहीतर पोटातील बाळासाठी चिंतेत असेल. ज्याला ती पुढील 18 ते 20 महिन्यात जन्म देणार होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, फटाके तोंडात फुटल्याने तोंड आणि जीभेला इजा झाली होती.
An act most #inhumane to will fully feed a pineapple full of fire crackers to friendly wild pregnant #Elephant is just unacceptable..strict action should be taken against the culprits sir 🙏🏽@vijayanpinarayi @CMOKerala @PrakashJavdekar @moefcc @ntca_india https://t.co/ittFQogkQV
— Randeep Hooda (@RandeepHooda) June 2, 2020
दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेत बाबत नेटकरी तीव्र प्रतिक्रिया देत आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. बॉलिवूड कलाकार रणदीप हुड्डा, अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूर, रिधिमा कपूर साहनी यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.