देशाच्या संरक्षण सचिवांना कोरोनाची लागण


नवी दिल्ली – देशाचे संरक्षण सचिव अजय कुमार यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ते सध्या होम क्वारंटाइन आहेत. सौम्य ताप अजय कुमार यांना आला होता व कोरोनाची लक्षणे त्यांच्यामध्ये आढळल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट मंगळवारी पॉझिटिव्ह आला. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

अजय कुमार हे कोरोनाची बाधा झालेले सरकारमधील पहिले वरिष्ठ अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले अन्य वरिष्ठ नोकरशहा, लष्करी अधिकारी आणि मंत्री यांची कोरोना चाचणी झाली का? ते अजून स्पष्ट झालेले नाही. संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय रायसीना हिल्स येथे साऊथ ब्लॉकमध्ये आहे. अजय कुमार यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर ३५ अधिकारी होम क्वारंटाइन झाल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. अजय कुमार यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध संरक्षण मंत्रालयाने सुरु केला आहे. साऊथ ब्लॉकच्या पहिल्या मजल्याचे निर्जतुकींकरण करण्यात आल्याची माहिती पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे.

Leave a Comment