नेटकऱ्यांना का हवा आहे युवराज सिंगचा माफीनामा ?


ट्विटरवर काल रात्रीपासून #युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग ट्रेंड होत असून नेटकरी माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने माफी मागावी अशी मागणी करत आहेत. युवराज सिंगने रोहित शर्मासोबत लाइव्ह चॅटदरम्यान आक्षेपार्ह शब्द उच्चारला होता. एखाद्या समाजाचा त्या शब्दामुळे अपमान झाल्याचे मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.


लॉकडाउनदरम्यान अनेकदा लाइव्ह चॅटच्या माध्यमातून युवराज सिंग याने खेळाडू आणि चाहत्यांशी संवाद साधला. त्याने विविध खेळाडूंशी संवाद साधताना काही प्रश्नांची उत्तरंदेखील दिली. रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांच्यामध्ये लाइव्ह चॅट सुरू होते. रोहित शर्मा त्यावेळी म्हणतो की, सर्वजण निवांत आहे. चहल, कुलदीपही ऑनलाइन आले आहेत. युवराजने त्यावेळी बोलता बोलता मस्करीत चहलबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारला. त्याला रोहितनेही मस्करीत दुजोरा देत म्हटले की, मीही चहलला सांगितले की, व्हिडिओत बापाला कशाला नाचवले. दोन खेळाडूतील हा संवाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्यावरुन युवराजला नेटकऱ्यांनी धारेवर धरताना #युवराज_सिंह_माफी_मांगो अशी मागणी ट्विटर केली आहे. दरम्यान या हॅशटॅग खाली 28 हजारांपेक्षा जास्त ट्विट करण्यात आले आहेत.

Leave a Comment