‘हिंदुस्तानी भाऊ’ची भारतीय जवानांचा अपमान केल्याप्रकरणी एकता कपूरविरोधात पोलीस तक्रार


डेली सोपची क्वीन अशी ओळख असलेल्या बालाजी टेलिफिल्म्सची मालकिन एकता कपूरने सध्या आपले लक्ष डिजिटल प्लॅटफॉर्मच्या केंद्रित केले आहे. त्याचबरोबर ‘अल्ट बालाजी’ नामक एक वेब सीरिज अ‍ॅप देखील तिने सुरु केले आहे. प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद या अ‍ॅपला मिळत आहे. पण भारतीय जवानांचा यावर दाखवल्या जाणाऱ्या एका सीरिजमधून अपमान करण्यात आल्याचा आरोप हिंदुस्तानी भाऊने केली आहे. या प्रकरणावरुन एकता कपूर विरोधात त्याने पोलीस तक्रार देखील केली आहे.

प्रसिद्ध युट्यूबर हिंदुस्तानी भाऊने एकताच्या ‘ट्रिपल एक्स’ या सीरिजवर संताप व्यक्त केला असून भारतीय सैनिकांचा अपमान या वेब सीरिजच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे. ‘ट्रिपल एक्स’ सीरिजच्या दुसऱ्या पर्वात एका सैनिकांची कथा दाखवण्यात आली आहे. सैनिक सीमेवर असताना त्याची पत्नी इतर पुरुषांसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करताना यामध्ये दाखवण्यात आले आहे. या कथेमुळे समाजात चुकीची माहिती पसरत आहे. सैनिकांच्या कुटुंबियांचा अपमान होत असल्याचा आरोप करत हिंदुस्तानी भाऊने एकता विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.


इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन हिंदुस्तानी भाऊने या तक्रारीबाबत माहिती दिली. सध्या सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यावर काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘ट्रिपल एक्स’ ही वेब सीरिज अभिनेत्रींच्या मादक दृश्यांमुळे प्रचंड गाजली होती.

Leave a Comment