सीबीआय मुख्यालयात करोनाची एन्ट्री

फोटो साभार न्यू इंडिअन एक्सप्रेस

देशाची मुख्य तपास यंत्रणा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन म्हणजे सीबीआयच्या दिल्ली येथील मुख्यालयात करोनाचा प्रवेश झाला असून येथील दोन अधिकारी करोना संक्रमित आढळले आहेत. हे दोघेही अधिकारी ज्युनिअर लेव्हलचे आहेत. त्यांची नावे जाहीर केली गेलेली नाहीत. मात्र या दोघांना सुटीवर पाठविले गेले असून घरातच क्वारंटाइन केले गेले आहे. घरातून हे दोघेही अधिकारी काम करणार असल्याचे समजते.

दिल्लीत करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे मात्र सीबीआय ऑफिस मध्ये करोना संक्रमित प्रथमच आढळले आहेत. संक्रमित झालेल्या या दोन अधिकाऱ्यांच्या संपर्कात कोण कोण आले याचा शोध सीबीआय स्वतः घेणार आहे. करोनाची सुरवात झाल्यानंतर सीबीआयने मार्च च्या तिसऱ्या आठवड्यापासून कार्यालयात सोशल डीस्टन्सिंग नियम पालन सुरु केले होते तसेच मास्क वापरणे बंधनकारक केले होते. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान मोजले जात होते असे सांगितले गेले.

दरम्यान दिल्लीत गेल्या २४ तासात ९९० नवीन केसेस आढळल्या असून आता संक्रमितांचा आकडा २० हजाराच्या वर गेला आहे. मृतांचा आकडा ५२३ असून ८७४६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या दिल्ली मध्ये ११५६५ अॅक्टीव केसेस आहेत. त्यातील ६२३८ जणांना त्यांच्या घरातच क्वारंटाइन केले गेले असून फोनवरून ते डॉक्टर्सशी संपर्कात आहेत. एक आठवड्यासाठी दिल्लीच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment