मुंबईतील फक्त ‘या’ पाच स्थानकांवर मिळणार टॅक्सी सेवा


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यापासून बंद असलेली मुंबईतील टॅक्सी सेवा सुरु करण्यास आता परिवहन आयुक्तालयाकडून मंजुरी देण्यात आली असून पण ही टॅक्सी सेवा केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि दादर या स्थानकांवर उपलब्ध असणार आहे.

त्याचबरोबर ही टॅक्सी सेवा प्रवाशांना रेल्वे स्टेशन आणि घर यादरम्यान प्रवासासाठीच उपलब्ध असणार आहे. आजपासून देशभरात काही नवीन रेल्वे धावणार असल्यामुळे मुंबईत बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी आणि ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय परिवहन आयुक्तालयाने घेतला आहे.

मुंबई टॅक्सीमेन्स संघटनेच्या प्रतिनिधींची रेल्वे स्थानकावरच टॅक्सीची शोधाशोध टाळण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. टॅक्सी ज्या प्रवाशांना आरक्षित करायची आहे, त्यांना फोन किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नोंदणी करता येईल. आजपासून सुरु होणाऱ्या ट्रेनमध्ये मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांनी आंतरराज्य प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे, पण राज्यांतर्गत या ट्रेनने प्रवास करता येणार नाही.

Leave a Comment