Video : सोनू सूदकडे त्या चिमुकलीने केली अनोखी मागणी


लॉकडाउनमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या मदत करत असल्यामुळे सोशल मीडियाद्वारे त्याच्याकडे अनेक कामगारांनी मदत मागत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोनूला दररोज हजारो मेसेज आणि ट्विट येत आहेत. दरम्यान सोनूकडे अनोखी मागणी एका चिमुकलीने केली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.


एका लहान मुलीचा व्हिडीओ सोनू सूदच्या ट्विटर अकाऊंटवर आहे. तिने या व्हिडीओमध्ये, बाबा, थांबा मी विचारते. सोनू काका मी असे ऐकले आहे की तुम्ही लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास मदत करत आहात. माझे बाबा विचारत आहेत, माझ्या आईला तुम्ही आजीच्या घरी पोहोचवू शकाल का?’ असे या व्हिडीओमध्ये ती गोंडस मुलगी बोलताना दिसत आहे. सोशल मीडियावर चिमुकलीचा हा मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. सोनू सूदने देखील या चिमुकलीच्या व्हिडीओवर मजेशीर अंदाजात उत्तर दिले आहे. हे खूप आव्हानात्मक आहे. मी माझ्या परीने प्रयत्न करतो, असे म्हटले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment