मुंबई: अनलॉक १ ची घोषणा केंद्र सरकारने शनिवारी केली असून त्यानुसार आता कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. त्यानुसार आठ जूनपासून प्रार्थनास्थळे, हॉटेल, मॉल सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर आता अनलॉक १ साठीची नियमावली राज्य सरकारने जाहीर केली आहे. या मार्गदर्शकतत्वानुसार राज्यात काय चालू आणि बंद रहाणार यावर एक नजर टाकूया…
अनलॉक १: राज्य सरकारने जाहीर केली नवी नियमावली
Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown.#MissionBeginAgain pic.twitter.com/3JJrWIWV4J
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 31, 2020
- शाळा, कॉलेज, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद राहणार आहे.
- केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीखेरीज आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास बंदच राहील.
- मेट्रो सेवा बंद राहील.
- थिएटर, हॉल, जीम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार, ऑडिटोरिअम, मंगलकार्याचे हॉल बंद राहतील.
- सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक एकत्र जमून साजरे होणाऱे कार्यक्रम बंदच राहतील.
- धार्मिक प्रार्थना स्थळे बंद राहतील.
- सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर बंदच राहतील.
- शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट बंदच राहतील.
- कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी सरकारी कार्यालये सुरू होणार
- रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
- कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाला
- पार्किंगप्रमाणेच सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू होणार