देशभरात २४ तासांत आढळले ८ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित


नवी दिल्ली – देशव्यापी पाचव्या टप्प्यातील लॉकडाउनची घोषणा केंद्र सरकारने केली असली तरी बऱ्याच प्रमाणात या टप्प्यात शिथिलता देण्यात आली आहे. देशात लॉकडाउनच्या चौथ्या टप्याच्या अखेरीस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये प्रतिदिन सात हजाराने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या आज, रविवारी ८ हजारांच्या पुढे गेली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत ८ हजार ३८० नवे रूग्ण आढळले असून ही एका दिवसातील आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

देशात मागील २४ तासांत ८ हजार ३८० कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर १९३ जणांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाबाधितांची देशातील संख्या एक लाख ८२ हजार १४२ एवढी झाली आहे. तर कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे. देशात आतापर्यंत पाच हजार १६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे गेल्या २४ तासांत ११,२६४ जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत तब्बल ८६ हजार ९८४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ८९ हजार ९९५ जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४२ टक्क्यांवरून ४७.४ टक्क्यांवर पोहचले आहे. हे प्रमाण एका दिवसात पाच टक्क्यांनी वाढले. पण मृत्यूची संख्याही गेल्या २४ तासांत सर्वाधिक आहे. रुग्णांच्या मृत्यूचा आकडा दोनशेहून म्हणजेच २६५ एवढा झाला आहे. कोरोनामुळे एकूण ४,९७१ मृत्यू झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत रुग्णदुपटीचे प्रमाण १५.४ दिवसांवर पोहोचले आहे. मृत्यूचे प्रमाण २.८६ टक्के झाले आहे.

Leave a Comment