‘अनलॉक 1’ कंटेनमेंट झोनपुरता मर्यादित लॉकडाऊन


नवी दिल्ली : केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत देशातील लॉकडाऊन वाढल्याची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन 1 जूनपासून 30 जूनपर्यंत महिनाभर असणार आहे. फक्त कंटेनमेंट झोनपुरताच लॉकडाऊन 5.0 हा मर्यादित आहे. या लॉकडाऊन दरम्यान कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने शिथिल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 8 जूननंतर अटींसह कटेंनमेंट झोन वगळता इतर भागात धार्मिक स्थळे, हॉटेल रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल टप्प्याटप्याने सुरु करण्यात येणार आहेत.

लॉकडाऊन 5.0 मध्ये संचारबंदीची वेळ कमी करण्यात आली असून रात्री 9 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. तर जुलै महिन्यात शाळा, कॉलेज शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. सर्व बाबी पडताळून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाला कटेंनमेंट झोनच्या सीमा निश्चित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. लॉकडाऊन 5 ला ‘अनलॉक 1’ असे नामकरण करण्यात आले आहे. कटेंनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे.

Leave a Comment