धोकादायक कोरोनाची पत्नीसोबत तुलना; संरक्षण मंत्र्याच्या वक्तव्यामुळे ‘हा’ देश वादाच्या भोवऱ्यात


नवी दिल्ली : जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत असतानाच इंडोनेशियामधील एका मंत्र्याने अशा महामारीच्या परिस्थितीत धोकादायक अशा कोरोनो व्हायरसची तुलना पत्नीसोबत केली आहे. त्यामुळे इंडोनेशिया हा देश आता चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कोरोना हा पत्नीसारखा असतो, असे वक्तव्य इंडोनेशियांचे संरक्षण मंत्री मोहमद महफूद एमडी यांनी केले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होताना दिसत आहे. त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य एका विद्यापीठातील विद्यार्थांसोबत ऑनलाइन संवाद साधत असताना केल्याचे सांगितले जात आहे.

तुमच्या पत्नीसारखा कोरोना हा असतो. तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी अखेर तुमच्या लक्षात येत, की पत्नीवर ताबा मिळवणे शक्य नाही, मग तुम्ही आहे, त्या परिस्थितीत जगायला शिकता, असे वादग्रस्त वक्तव्य इंडोनेशियांचे संरक्षण मंत्री मोहमद महफूद एमडी यांनी केले आहे


संरक्षण मंत्री मोहमद महफूद एमडी यांनी केल्यामुळे इंडोनेशियामधील वातावरण चांगलेच तापले आहे. त्याचबरोबर मंत्र्यांच्या या वक्तव्यावर महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक गटांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या अनेक संघटना देखील पुढे आल्या आहेत.

दरम्यान कोरोनाने देशात थैमान घातलेले असताना देशाला या महामारीवर नियंत्रण मिळविण्यात सतत अपयश मिळत आहे. त्यात अशाप्रकारच्या वक्तव्यांमधून सरकार या विषयी गंभीर नसण्यासोबतच देशातील लैंगिकतावाद आणि महिलांबद्दलचा द्वेष दिसून येतो, असे म्हणत दिंडा निसा युरा यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Leave a Comment