यंदा साधेपणाने पार पाडली एनडीए पासिंग आउट परेड

फोटो साभार भास्कर

करोना संक्रमणाचा वाढता धोका आणि देशात लागू असलेल्या लॉक डाऊन मुळे यंदा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएची पासिंग आउट परेड अतिशय छोट्या स्वरुपात पार पडली. बटालियन कॅप्टन कॅडेट शिवमकुमार याने प्रथम क्रमांक मिळविताना राष्ट्रपती सुवर्णपदक पटकावले तर कॅप्टन मुकेशकुमार याने रजत तर कॅप्टन पार्थ गुप्ता याने ब्राँझ पदक मिळविले. एनडीएचे कमांडर लेफ्टनंट जनरल असित मिश्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात पासिंग कोर्सचे कॅडेट आणि एनडीए स्टाफ इतकीच उपस्थिती होती.

शनिवारी झालेला हा कार्यक्रम नेहमीप्रमाणे खडकवासला कॅम्पस मधील परेड ग्राउंड मैदानावर न होता हबीबुल्ला सभागृहात पार पडला. यावेळी सोशल डीस्टन्सिंगचे काटेखोर पालन केले गेले तसेच सर्वाना मास्क लावणे बंधनकारक केले गेले होते. यंदा कोविड १९ साथ आणि लॉकडाऊन मुळे कॅडेट्सच्या पालकांना बोलावले गेले नव्हते तसेच ड्रील घेतली गेली नाही.

यंदाच्या पासिंग आउट परेड मध्ये ३३५ कॅडेटना पदवी दिली गेली. त्यातील २२६ लष्करी सेवेत, ४४ नौसेनेत तर ६५ वायुसेनेत निवडले गेले. भूतान, कझाकिस्तान, उज्बेकीस्तान, तुर्कमेनिस्तान, फिजी, सुदान, मंगोलिया, बांग्लादेशच्या २० कॅडेटनाही यावेळी पदवी दिली गेली.

Leave a Comment