बहिणीसाठी अक्षयकुमारने बुक केले होते का अख्खे विमान?


फोटो साभार नवभारत टाईम्स
देशातील करोना लढाईविरोधात पैशांच्या स्वरुपात मोठे योगदान दिलेल्या बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमार याने बहिणीसाठीही हात मोकळा केला अशी बातमी होती.पण हि बातमी खोटी आहे .अक्षयने लॉकडाऊन मुळे मुंबईत अडकून पडलेल्या बहिणीला तिच्या घरी सुखरूप जाता यावे म्हणून अख्खी फ्लाईट बुक केली. अक्षयने बहिण अलका, तिची दोन मुले आणि मेड अश्या चौघांसाठी लाखो रुपये मोजून मुंबई दिल्ली फ्लाईट बुक केली आणि विशेष म्हणजे सोशल मिडियावर या कृतीसाठी त्याच्यावर टीका केली गेली.

करोनामुळे देशात गेले अडीच महिने लॉकडाऊन आहे आणि त्यामुळे अनेक नागरिक स्वतःच्या घरापासून दूर अडकून पडले आहेत. अक्षयने त्याच्या बहिणीला आणि मुलांना करोना संसर्गाचा धोका होऊ नये आणि सुखरूप घरी परतता यावे यासाठी अख्खी फ्लाईट बुक केली मात्र कोविड १९ साठी लागू असलेले सोशल डीस्टन्सिंग, प्रोटोकॉल, सुरक्षा उपायांचे काटेखोर पालन त्यासाठी केले गेले. अलका भाटिया याना प्रवासात कोणत्याही विशेष सुविधा दिल्या गेल्या नाहीत असेही स्पष्ट केले गेले आहे.

काही दिवसांपूर्वी एका उद्योगपतीनेही त्याच्या कुटुंबातील चार जणांसाठी दिल्ली भोपाळ अख्खी फाईट बुक केली होती.


या पूर्ण घटनेवर खुद्द अक्षय कुमारने ट्विट करून स्पष्टीकरण देत हि बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर असा कोणताही प्रकार झालेला नाही. काही लोक मुद्दाम अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. अशी खोटी बातमी देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment