महाराष्ट्रातून या महिन्यात जाणार करोना

फोटो साभार इकॉनॉमिक टाईम्स

करोना कोविड १९ च्या उद्रेकातून भारत अजून बाहेर पडण्याची शक्यता दिसत नसताना देशाच्या विविध राज्यातून आणि शहरातून करोना कधी संपणार याचे अंदाज एसईआयआर व हायब्रीड या दोन मॉडेल्सच्या सहाय्याने वर्तविले गेले आहेत. ही एक प्रकारची गणिती पद्धत असून देशात सध्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजराथ, राजस्तान सह अनेक राज्यात करोना संपण्याचा कालावधी गणिताच्या मदतीने ठरविला गेला आहे.

हे अंदाज देताना राज्यात समोर आलेल्या ताज्या केसेस, मृतांची संख्या व रुग्ण बरे होण्याचे प्रमाण या आकड्यांचा विचार केला जातो. त्यानुसार करोना संपण्याची संभाव्य तारीख सांगता येते. भारतात प्रवासी मजुरांची संख्या मोठी असल्याने हे अंदाज वर्तविण्यात थोड्या अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.

२१ मे रोजीच्या आकडेवारीनुसार भारतात १.१३ लाख करोना संक्रमित होते आणि त्यातील ६३ हजार अॅक्टीव्ह केसेस होत्या तर मृत्यूचा आकडा होता ३४३५. महाराष्ट्रात ५० हजाराहून अधिक करोना संक्रमित आणि १४०० पेक्षा जास्त मृत्यू झाले असून देशात हे राज्य या बाबतीत आघाडीवर आहे. एसईआयआर मॉडेल नुसार महाराष्ट्रातून २३ ऑगस्ट रोजी करोना नाहीसा होईल तर हायब्रीड मॉडेल नुसार ही तारीख २९ जुलै आहे. मुंबईसाठी याच तारखा अनुक्रमे २५ ऑगस्ट आणि ५ जुलै अश्या आहेत.

तामिळनाडू मध्ये एसईआयआर मॉडेल नुसार ११ ऑगस्ट आणि हायब्रीड मॉडेल नुसार १ जुलै अश्या तारखा दिल्या गेल्या आहेत. दिल्लीत याच तारखा अनुक्रमे १५ ऑगस्ट आणि ३० जुलै, उत्तर प्रदेशासाठी १९ ऑगस्ट आणि ३० जुलै, गुजराथ साठी १८ ऑगस्ट आणि ८ जुलै, राजस्तान साठी १८ ऑगस्ट आणि २६ जुलै अश्या दिल्या गेल्या आहेत. चेन्नई साठी या तारखा ३१ ऑगस्ट आणि १२ जुलै, अहमदाबाद साठी २६ ऑगस्ट आणि ३० जून अश्या दिल्या गेल्या आहेत.

Leave a Comment