आपल्या देशातील क्रिकेट प्रेमा आम्ही आपल्या काही नव्याने सांगायला नको. त्यातच आपल्या देशाचा सामना सुरु असताना तो कोण जिंकणार याची उत्सुकता देखील कमालीची असते. त्याचबरोबर येsssss माराsss असे शब्द कानावर पडताच होणार जल्लोष आपल्याला काही नवीन नाही. पण आम्ही आज तुम्हाला एक व्हिडीओ दाखवणार आहोत, ज्यातील फलंदाजाने मारलेला षटकार एबी डिव्हीलियर्स आणि महेंद्र सिंह धोनीला देखील जमणार नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
व्हिडीओ; एबी आणि धोनीला जमणार नाही असा षटकार ठोकला या पठ्ठयाने
एखाद्या पंथाप्रमाणे भारतामध्ये रुजलेला क्रिकेट हा खेळ म्हणजे अनेकांचा जीव की प्राण आहे. आजच्या घडीला अशा या खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना लोकप्रियता आणि यश मिळाले आहे. त्यातच या खेळाने आतापर्यंत एका स्थानिक, गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूच्या अफलातून खेळीची झलक सर्वांपर्यंत आणली आहे.
@shameersyam different shot 😎 ##cricketlover
ज्याप्रमाणे आपल्या अफलातून क्रिकेट शैलीसाठी एखादा खेळाडू ओळखला जातो, त्याचप्रणाणे हा पठ्ठ्या त्याच्या धमाकेदार षटकारासाठी लाखो लोकांची मने जिंकत आहे. या पठ्ठ्याने महेंद्रसिंह धोनीच्या हॅलिकॉप्टर शॉटच्याही पलीकडे जात एक दमदार फटका मारत अनोख्य अंदाजात चेंडू पार सीमारेषेपलिकडे पाठवल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सोशल मीडियावर सहसा अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण, हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने खास असल्यामुळे आता विचित्र पण, तितकाच लक्षवेधी षटकार मारणाऱ्या या गल्ली क्रिकेट स्टारच्या खेळीची दिग्गज क्रिकेटपटू दखल घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.