1 तारखेपासून पुन्हा सुरु होणार पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग


पुणे – पुणेकरांची खरेदीसाठी पहिली पसंती असणारी तुळशीबाग ‘कोरोना’ लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जवळपास अडीच महिने बंद होती. आता तिच तुळशीबाग एक जूनपासून पुणे महापालिका प्रशासनाच्या परवानगीनंतर सुरु होणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रात तुळशीबाग ही येत नसल्यामुळे यासंदर्भात पालिका प्रशासनाला तुळशीबाग परिसर व्यापारी संघटनेने निवेदन दिले होते. मार्केट सुरक्षेसंदर्भात उपाययोजना राबवून सुरु करण्याची हमी संघटनेने दिली होती.

जवळपास 300 दुकाने पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तुळशीबाग परिसरात आहेत. तेथील व्यापाऱ्यांचा एक दिवसाआड एक दुकान सुरु करण्याचा विचार आहे. तुळशीबागेच्या सहा गल्ल्यांच्या एन्ट्री पॉईंटला दुकाने सुरु करताना सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत. त्याचबरोबर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे सॅनिटायझेशन करण्यात येईल. तसेच ग्राहकांचे तापमान देखील तपासले जाईल, अशी माहिती तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशनने दिली. तुळशीबागेसोबतच पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा फुले मंडईसुद्धा एक तारखेपासून सुरु होणार आहे.

Leave a Comment