मोठी बातमी; देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत


पुणे : आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघणाऱ्या पालख्यांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. वारकरी आणि प्रशासनाचे देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत एकमत झाले असून दशमीला पंढरपूरला आळंदी आणि देहूच्या पादुका जाणार आहेत. पण विशेष म्हणजे हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने या पादुका नेण्याचे हे नंतर ठरलवे जाणार आहे.

आज अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात वारीबाबत महत्वाची बैठक झाली. आषाढी वारी कशी पार पाडायची आणि आळंदी आणि देहूहून पादुका पंढरपूरला नेण्याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका या बैठकीत मांडल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भूमिका ऐकून घेतल्या.

त्यानंतर हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने आळंदी आणि देहूवरुन निघणाऱ्या पादुका पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भूमिका मांडण्यात आली. मानाच्या सात पालखी दशमीला पादुका जातील, पायी वारी जाणार नाही, पादुका विमान हेलिकॉप्टर किंवा विमान यावर निर्णय घेतला जाईल, यावर दशमीला निर्णय होईल. प्रशासनाकडून परंपरेचा सांगड घालण्याचा प्रयत्न होत आहे. इतर वाहन किंवा विमान सरकार उपलब्ध करणार आहे. कमीत कमी वारकरी पालखी बरोबर असतील. पादुकांचे प्रस्थान अष्टमीला होईल, दशमीला पंढरपूरात आगमन होईल.

Leave a Comment