गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त पंकजा मुंडेंचे आवाहन


बीड : पुढील महिन्याच्या 3 तारखेला भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी असून देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोनाचे संकटामुळे देशात आणि राज्यात लॉकडाऊन सुरु असल्यामुळे साहेबांची पुण्यतिथी आपण घरीच थांबून करायची. साहेबांच्या आवडीचा पदार्थ या दिवशी करायचा आणि घरातच फोटोसमोर दोन दिवे लावून अभिवादन करायचे, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम 3 जून रोजी गोपीनाथ गडावरच होणार आहे. हा कार्यक्रम लाईव्ह असेल कोणीही गडावर गर्दी करु नये, अशा सूचना सुद्धा पंकजा मुंडे यांनी दिल्या आहेत. पंकजा यांनी हे आवाहन फेसबुक आणि ट्विटरद्वारे केले आहे.

पंकजा मुंडे यांची पोस्ट

Leave a Comment