करोना संकटात ही बनारसी आंबे दुबईला रवाना

फोटो साभार नवभारत टाईम्स

करोनाच्या विळख्यात देश विदेशातील उद्योग क्षेत्र सापडले असताना वाराणसी मधून एक चांगली बातमी आहे. गुरुवारी जयपूर गावातील जया सिड्स प्रोड्युसर कंपनीने प्रथमच प्रसिद्ध लंगडा आणि दशहरा जातीचे आंबे दुबईला निर्यात केले आहेत. तीन टनाची पहिली खेप दुबईला रवाना झाली असून दुसरी दहा टनाची खेप लवकरच पाठविली जाणार आहे.

वाराणसी जवळचे जयापूर गाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतले आहे. राजा तालाब भिखारीपूर बागेतील या आंब्याच्या निर्यातीला कमिशनर दीपक अग्रवाल यांनी हिरवा कंदील दाखविला. ते म्हणाले गेल्या काही दिवसांपासून येथील भाज्या, हिरवी मिरची दुबईला निर्यात केली गेली असून तेव्हापासूनच आंब्याला मागणी येत होती. लंगडा, दशहरा आंबे विदेशात प्रसिद्ध असून त्यांना चांगली मागणी आहे. लवकरच लंडन येथेही आंबे निर्यात केले जाणार आहेत.

निर्यात आंबे प्रथम लखनौला जातील आणि तेथे पॅकिंग होऊन दिल्ली मार्गे दुबईला जातील. शेतकऱ्यांची कमाई दुप्पट करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले होते, ही निर्यात त्या दृष्टीने टाकलेले पाउल आहे. निर्यात आंबे शार्दुल विक्रम चौधरी यांच्या बागेतील असून त्यांच्या बागेत चौसा, रामखेड, लंगडा, दशहरा, सफेदा असे अनेक जातीचे आंबे येतात. निर्यातीमुळे लॉकडाऊन मध्ये खीळ बसलेल्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्यास मदत होणार असल्याचे चौधरी म्हणाले.

Leave a Comment