प्रेयसीच्या उपचारासाठी युवकाने स्वतःचा कंपनीला घातला 8.51 लाखांना गंडा

तेलंगानाची राजधानी हैदरबाद येथे एका युवकाने आपल्या प्रेयसीच्या उपचारासाठी चोरीचा बनावट डाव रचला होता. एम. अच्ची रेड्डी नावाच्या युवकाने 8.51 लाख रुपये हडपण्यासाठी चोरीची बनावट कहाणी पोलिसांना सांगितली. मात्र पोलिसांनी चौकशी सुरू करताच युवकाचे खोटे समोर आले.

पोलिसांनी सांगितले की, युवक एमबीए पदवीधर असून, तो एका पेपर मिलमध्ये अकाउंटेंट कम कलेक्शन बॉयचे काम करत होतो. 25 मे रोजी त्याने वेगवेगळ्या एजेंट्सकडून 8.51 लाख रुपये जमा केले. यानंतर त्याने पोलिसात तक्रार केली की काही लोकांनी त्याच्या जवळील पैसे लुटले व सर्व आरोपी रक्कम घेऊन फरार झाले.

पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर सत्य समोर येण्यास वेळ लागला नाही. पोलिसांनी चौकशी केल्यावर युवकाने पैसे हडपण्यासाठी स्वतःच बनावट कहाणी रचल्याचे समोर आले. पोलिसांनी सर्व पैसे जप्त केले असून, युवकाला अटक केले आहे.

पोलिसांनुसार, आरोपी एका महिलेच्या प्रेमात असून, महिला गंभीर आजाराने ग्रस्त आहे. त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नसल्याने युवकाने पैसे चोरी झाल्याचा बनाव रचला.

Leave a Comment