राम गोपाल वर्मांच्या ‘कोरोना व्हायरस’चा ट्रेलर रिलीज


कोरोना व्हायरससारख्या महामारीने संपूर्ण जगभरात हैदोस घातला आहे आणि त्यामुळे जगभरातील बहुतांश देशांमध्ये लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण आपल्या घरांमध्ये बंद आहेत. अशातच आपल्या फार्महाऊसवर एक गाणे रेकॉर्ड करून बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानने शूट केले. त्याचबरोबर त्याने हे गाणे रिलीज देखील केले आहे. सलमान खाननंतर आता बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्मात-दिग्दर्शक राम गोपाल वर्माने आपल्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. सर्वांना हैराण करणारे असे या चित्रपटाचे नाव आणि थिम आहे. ‘कोरोना व्हायरस’ असे या चित्रपटाचे नाव असून त्याची थीमदेखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आहे.

या चित्रपटाचे निर्माते राम गोपाल वर्मा असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अगस्त्य मंजू यांनी केले आहे. तेलगूमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. चार मिनिटांपेक्षा मोठा चित्रपटाचा ट्रेलर आहे. यामध्ये अगस्त्य मंजू मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत. हा चित्रपट श्रेयस ईटी अॅपवर रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरच्या शेवटी दावा करण्यात आला आहे की, कोरोना व्हायरसवर आधारीत हा जगातील पहिला चित्रपट असणार आहे. परंतु, कन्नड दिग्दर्शक मुस्तफा केशवारी यांनी एप्रिलमध्येच ‘कोरोना’ नावाचा चित्रपट तयार केला आहे.


ट्रेलर रिलीड केल्यानंतर राम गोपाळ वर्मा यांनी सांगितले की, लॉकडाऊनवर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. लॉकडाऊन दरम्यान हे शूट करण्यात आले आहे. त्याचबरोबर मला सिद्ध करायचे होते की, कोणीही माझे काम रोखू शकत नाही, मग तो देव असो वा कोरोना.

Leave a Comment