अल्बर्ट उड्रेझो या प्रसिद्ध कॉमिक बुक आर्टिस्टच्या 4 ओरिजनल चित्रांची जवळपास 4 लाख युरोंना विक्री झाली असून, ही रक्कम पॅरिसमधील एका हॉस्पिटलला दान केली जाणार आहे. अल्बर्ट उड्रेझो हे ‘अॅस्ट्रिक्स द घोल’ या आपल्या कॉमिक बुकसाठी जगभरात प्रसिद्ध झाले होते. मार्च महिन्यात कोरोना व्हायरसमुळे वयाच्या 92व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
कोरोनामुळे झाले होते या दिग्गज चित्रकाराचे निधन, आता परिवाराने चित्र विकून दिले 3 कोटी हॉस्पिटलला दान
आर्टकुरियल या ऑक्शन करणाऱ्या कंपनीने सांगितले की, 4 मूळ कार्टून्सची तब्बल 3,90,000 यूरोला (जवळपास 3 कोटी 23 लाख रुपये) विक्री झाली. अल्बर्ट यांनी स्क्रिपटरायटर रेने गोसिनी यांच्यासोबत मिळून अॅस्ट्रिक्स पात्र निर्माण केले होते. ऑक्शनमध्ये विक्री झालेल्या चित्रांमध्ये “Asterix and the Secret Weapon” आणि “Asterix and Obelix All At Sea” यांचा समावेश होता. या विक्रीतून मिळालेली रक्कम त्यांच्या पत्नी आणि मुलीने कोरोनाच्या लढाईत पॅरिसमधील हॉस्पिटलला दान केली.