खुषखबर: कोरोना प्रतिबंधक लस संशोधनाच्या महत्वाच्या टप्प्यावर पोहचली अमेरिकन कंपनी नोव्हाव्हॅक्स


नवी दिल्ली – कोरोना या जीवघेण्या व्हायरससमोर संपूर्ण जग हतबल झाले असून अद्याप या व्हायरसला रोखू शकले अशी कोणतीही प्रतिबंधक लस सध्या जगात तरी उपलब्ध नाही. पण जगभरातील संशोधक या व्हायरसाचा प्रादुर्भाव रोखणारी लस शोधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला अमेरिकेतील मॉर्डन या कंपनीकडून विकसित करण्यात आलेल्या लसीची मानवी चाचणी करण्यात आली असून अमेरिकेतील या पहिल्या चाचणीतून समाधानकारक निष्कर्ष समोर आले आहेत. या लसीची चाचणी ज्यांच्यावर करण्यात आली त्यांच्या शरीरात याचे कुठलेही दुष्परिणाम दिसलेले नाहीत तसेच कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढल्याचे ही लस विकसित करणाऱ्या मोडर्ना कंपनीने जाहीर केले होते.

मोडर्नानंतर आणखी एक अमेरिकन कंपनी नोव्हाव्हॅक्सने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी सुरु केली आहे. ऑस्ट्रेलियात या लसीच्या मानवी चाचण्या सुरु झाल्याची अमेरिकन बायोटेक्नोलॉजी कंपनी नोव्हाव्हॅक्सने घोषणा केली आहे. त्याचबरोबर कंपनीने या वर्षातच कोरोना प्रतिबंधक लस पूर्णपणे विकसित करु असा आशावाद कंपनीने व्यक्त केला आहे. यासंदर्भातील वृत्त द हिंदूने दिले आहे.

पहिल्या टप्प्यात मेलबर्न, ब्रिस्बेन या शहरातील १३१ स्वयंसेवकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीतून ही लस कितपत सुरक्षित आणि प्रभावी ठरते ते लक्षात येईल असे कंपनीचे संशोधन प्रमुख डॉक्टर ग्रेगोरी ग्लेन यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी ऑस्ट्रेलिया, युरोप आणि चीनमध्ये मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. हे सर्व संशोधन वेगवेगळया टप्प्यांवर आहेत.

अमेरिकन कंपनी मॉडर्नाने कंपनीची पहिली मानवी चाचणी यशस्वी ठरली आहे. पहिल्या आठ जणांच्या चाचणीतून ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. शरीरातील कोरोना व्हायरसला ओळखून त्याचा खात्मा करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीला प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने लस विकसित करण्यात येत आहे.

लस संशोधनासाठी नोव्हाव्हॅक्सला डॉलरच्या स्वरुपात मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याआधी प्राण्यांवर लसीची नोव्हाव्हॅक्सने चाचणी घेतली. त्यात आश्वासक, चांगले परिणाम मिळाले आहेत. पुढच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियात १३० जणांवर मानवी चाचणी करण्यात येणार आहे. उंदीर आणि माकडांवर करण्यात आलेली लस चाचणी खूपच आश्वासक ठरली असल्याचे डॉ. ग्रीगोरी ग्लेन यांनी सांगितले होते. डॉ. ग्रीगोरी ग्लेन हे नोव्हाव्हॅक्सचे संशोधन आणि विकास विभागाचे अध्यक्ष आहेत.

Leave a Comment